यवतमाळमधील तेरा वर्षांचा अंकुश आडे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजीपाला विकतो. घरची परिस्थिती नाजूक असल्याने या चिमुकल्याने कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. शाळेतून संध्याकाळी घरी आल्यानंतर अंकुश गावात फिरून भाजीपाला विकतो. भाजीपाला विकून मिळणाऱ्या पैशातून तो शाळेची फी आणि घरखर्चाला हातभार लावतो. भाजीपाला विक्रीतून अंकुश दारू मुक्तीचा संदेशही देतो. त्याची भाजी विकण्याची स्टाइल आणि आरोळ्या या गावात चर्चेचा विषय बनल्या आहेत. अवघ्या तेरा वर्षात घराची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या अंकुशचं कौतुक होत आहे.