मरिन ड्राइव्ह... म्हटल्यावर मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य येतं. कारण ही जागा प्रत्येक मुंबईकरासाठी खास आहे. अनेकजण मस्करीत म्हणतात मरिन ड्राइव्ह नही देखा तो क्या देखा. हेच मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ असणारे मरिन ड्राइव्ह आज १०५ वर्षांचे झाले आहे. १८ डिसेंबर १९१५ या दिवशी गिरगाव चौपाटीजवळ पहिला दगड ठेऊन मरिन ड्राइव्ह बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. मरिन ड्राइव्हशी प्रत्येकजण वेगळ्या माध्यमातून कनेक्ट होतो. काहीजण प्लॅन करुन भटकायला येतात तर काहीजण एकटेच आत्मचिंतन करत मरिन ड्राइव्हला बसलेले दिसतात. मुंबईत सर्वाधिक सेल्फी क्लिक होणारी ही एकमेव जागा असावी असंही मरिन ड्राइव्हला पाच मिनिटं फिरलं तरी वाटतं. उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा मरिन ड्राइव्हर पर्यटकांच्या आणि समुद्राच्या लाटा येतच असतात. तिन्ही ऋतूंमध्ये मरिन ड्राइव्ह सुंदरच दिसते.