जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. २५ डिसेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचं सांगितलं. त्यानंतर जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केला आहे. यासंबंधीचे ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.