राज्य सरकारचा परीक्षेसंदर्भातील सावळा गोंधळ सुरूच आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर आता राज्य सरकराने १२ डिसेंबर २०२१ रोजी राज्यभरात होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा मध्यरात्री दीड वाजता रद्द केल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल मध्यरात्री उशिरा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. याबद्दल संताप व्यक्त करत अभविपकडून पुण्यात राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. अशाप्रकारे परीक्षा रद्द केल्यामुळे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.