#nashikliveupdate #NashikNewsUpdate #94thMarathiSahityaSammelan
#MaharashtraLiveUpdate #MarathiSahityaSammelan #MarathiNews
#esakal #sakalmediagroup
नाशिक : मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांच्याविना या परंपरेत कोल्हापूर, महाबळेश्वरनंतर आता नाशिकचा क्रमांक लागला. संमेलनाध्यक्ष डॉ जयंत नारळीकर यांच्या उपस्थितीविना 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज सायंकाळी साडेचारला उदघाटन होईल.
ढगाळ हवामान, गारठा आणि धुके अशा वातावरणात ग्रंथदिंडीला सुरवात होत आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघून सार्वजनिक वाचनालय पर्यंत जाईल. इथून बसमधून ती मेट भुजबळ नॉलेज सिटी मधील कुसुमाग्रजनगरीत पोचेल. मग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.