भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवल्याचे समोर आले. तर, आयकर विभागाने अशी कोणतीही नोटीस अजित पवारांना पाठवलेली नसल्याचं त्यांच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु आता सोमय्यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधून पवारांच्या मित्र परिवारांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली असल्याचं, सांगितलं आहे. शिवाय 'पवार कुटुंबीय किती वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला फसवणार?', असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.