उपमुख्यमंत्री अजित पवार संबंधित जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ईडी कार्यालयात जाऊन माहिती दिली. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला आहे, असा आरोप त्यांनी अजित पवारांवर लावला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.