मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. आर्यन खानला जामीन मिळाल्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.