मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगात आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी दाखल केलेले जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला. एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत आर्यन खानला जामीन मिळणार का? यावर ज्येष्ठ कायदेतज्ञ मजिद मेमन यांनी मत मांडले आहे.
#MajeedMemon #AryanKhan #DrugsCase #NCB #MumbaiHighCourt