दिवाळी सणाची सगळीकडे लगबग सुरु आहे. दिवाळीसाठी पैठणी साड्या खरेदी करण्याकरिता महिलांची येवला शहरात गर्दी होऊ लागली आहे. येवला हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून विविध लोक पैठणी खरेदीसाठी येवला शहरात येत असतात. अनुपमा चिंचाळकर या देखील अशाच पैठणी खरेदी करण्यासाठी न्यूझीलंडवरून थेट येवल्यात दाखल झाल्या. पुण्यातील आपल्या परिवारासोबत त्या येवला येथे पैठणी खरेदीसाठी आल्या होत्या.