Rain Updates Parbhani : लोअर दूधना प्रकल्प धरणाचे चौदा दरवाजे उघडले

Sakal 2021-09-29

Views 127

Rain Updates Parbhani : लोअर दूधना प्रकल्प धरणाचे चौदा दरवाजे उघडले

Selu (Parbhani) : तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण (Lower Dudhana Dam) शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता बुधवारी ( ता.२९) प्रकल्पाचे द्वार क्र.१, २ , ३, ४, ५, ६, ७ व १४, १५, १६, १७, १८, १९, २० हे चौदा दरवाजे उचलून ३०,३२४ क्यूसेक्सने दूधना नदी पात्रात विसर्ग बुधवारी सकाळी साडेसात वाजता सोडण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असून नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.असे लोअर दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Video : विलास शिंदे

#LowerDudhanaDam #Selu #Parbhani

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS