जाणून घ्या । अमेरिकी सीआयए अधिकाऱ्यावर हल्ला झालेला हवाना सिंड्रोम काय प्रकार आहे
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा भारत दौरा काही दिवसांपूर्वी पार पडला. भारतभेटीसाठी आलेल्या एका सीआयए अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोमची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हवाना सिंड्रोम भारतात आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. जगातील रहस्यमयी गणल्या जाणाऱ्या हल्ल्यांपैकी हवाना सिंड्रोम एक आहे. पण हा हवाना सिंड्रोम नक्की आहे तरी काय, जाणून घेऊया.