शिव सेनेने जिंकण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातल्या आमदारांना पक्षात ओढण्याचा कार्यक्रम धडाक्यात सुरु केलाय. याचा सगळ्यात मोठा फटका राश्यतावाडी काँग्रेस आणि काँग्रेसला बसतोय. यासोबतच बहुजन विकास आघाडीचे विलास तरे हे लवकरच शिव बंधनात अडकणार आहेत.
राष्ट्रवादीचे बार्शीचे आंडा दिलीप सोपल शिव सेनेत जाणार आहेत. सोपल यांनी त्यांचा आर्यन कारखाना विकला पण शेतकऱ्यांचे पैसे ठाकवले. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत.
अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा मतदारसंघ शिव सेनेकडे आहे. त्यामुळे ते शिवबंधन बांधून सेनेतर्फे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत असं विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला सांगितलं. असं असलं तरी खासदार सुप्रिया सुळे यांचा एक मोठा कार्यक्रम नुकताच आयोजित केल्यामुळे ते आपले मनसुबे जाहीर करायला कचरत आहेत.
श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप पक्षांतराच्या तयारीत आहेत. हि जागा सध्या भाजपाकडे आहे पण शिव सेनेने मागितली आहे.
गेल्या काही महिन्यांनी नगर जिल्ह्यातील सगळं राजकारणाचं बदलला आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसकडे आता दोनच आमदार उरले आहेत. एक खुद्द प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तर श्रीरामपूरचे भाऊसाहेब कांबळे !!!
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19