टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं ३५ वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला.विराट कोहली वन डे इतिहासात पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या. विराटने या सहा सामन्यांमध्ये ५५८ धावा केल्या.रोहित शर्माने २०१३-१४ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे मालिकेत ४९१ धावा केल्या होत्या. हा विक्रम विराट कोहलीने मोडित काढला. विराटने डर्बनमध्ये नाबाद १२, केपटाऊन मध्ये नाबाद १६९ आणि सहाव्या सामन्यात नाबाद १२८ धावांची खेळी केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews