भारत दक्षिण आफ्रिका कसौटी मालिका आज पासून | भारत पुढे मोठे आव्हान | Lokmat Sport Update | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 15

भारत अाणि यजमान दक्षिण अाफ्रिका यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवार ५ जानेवारी पासून सुरुवात हाेत अाहे. यातील सलामीची कसाेटी केपटाऊनच्या मैदानावर रंगणार अाहे. येथून भारतीय संघाला अापल्या विश्वविक्रमाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी अाहे. सध्या सलगच्या मालिका विजयाने टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त फाॅॅर्मात अाहेत. काेहलीच्या नेतृत्वात संघ मालिका विजयाच्या मिशनला चांगली सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. टीम इंडियाला गत सत्रात सर्वाधिक मालिका विजय मिळवून देणारा काेहलीही अाता अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज अाहे. या कसाेटीसाठी खेळपट्टीचा अंदाज घेऊन टीममधील बदलाचा निर्णय घेण्यात येणार अाहे. यासाठी राेहित व हार्दिक यांच्यापैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता अाहे. भारताला यजमान दक्षिण अाफ्रिकेच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे. कारण मागील २६ वर्षांपासून भारताला या ठिकाणी अद्याप एकही मालिका विजय संपादन करता अाला नाही. त्यामुळे ही मालिका खंडित करण्यासाठी काेहलीच्या नेतृत्वाखाली भारताचे खेळाडू सज्ज अाहेत


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS