संसदेत काँग्रेस खासदार रेणुका चौधरींच्या हसण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची रामायणातील शुर्पणखेशी तुलना केली होती. मोदींच्या या टिप्पणीचा काँग्रेसने निषेध केला. आता रेणुका चौधरींनीही मोदींवर पलटवार केला आहे. हसण्यावर कोणताही जीएसटी नाही. त्यामुळे हसण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरजही नसल्याचे त्यांनी म्हटले. माझ्यावर केलेल्या वक्तव्यावरून मोदींची महिलांप्रती असलेली मानसिकताही समोर येते, असा टोलाही त्यांनी लगावला. मी पाच वेळा खासदार राहिले आहे आणि पंतप्रधान माझी तुलना नकारात्मक पात्राशी करतात. परंतु, ते विसरले आहेत की, आज महिला बदलल्या आहेत. महिलांप्रती त्यांची काय मानसिकता आहे, हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे, असेही त्यांनी म्हटले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews