यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यात कुठेही पाणी साचू नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असून ५३.७१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासन नेहमीप्रमाणे पाणी नेमके कुठे तुंबते याचा शोध घेण्यात लागली आहे. मुंबई शहर व उपनगरातील जवळपास १४६ ठिकाणी पूरजन्य असल्याचे निर्दशनास आले. यंदाच्या पावसाळ्यात पाणी जमा होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्याची कामे हाती घेतली आहेत. मात्र ही कामे पावसाळ्यापूर्वी किती पूर्ण होतात आणि मुंबई पुन्हा एकदा तुंबते का, हे पुढील चार महिन्यांनंतर स्पष्ट होईलच.पावसाला सुरुवात होताच सर्वप्रथम दादर, हिंदमाता, परळ, शीव, अंधेरी, घाटकोपर आदी भागात पाणी जमा होते आणि मुंबई पावसाच्या पहिल्याच बॅटिंगमध्ये आऊट होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews