शहरांना जोडणाऱ्या 'सी प्लेन' उड्डाणाची मुंबईत यशस्वी चाचणी | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. देशातील लहान आणि मोठी शहरं जोडण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जातंय. 'स्पाईस जेट' कंपनी वर्षभरात सीप्लेन सेवा देशात सुरू करणार आहे. रस्ते, जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत सीप्लेनची चाचणी घेण्यात आली.
समुद्राबरोबरच नदी, तलाव, धरणातही सीप्लेन उतरू आणि उड्डाण करू शकते. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि गुवाहाटी इथं जमिनीवर विमान उतरवण्या ची चाचणी झाली. 10 आणि 14 सीटरचं सीप्लेन असणार असून यासाठी केवळ 300 मीटरच्या रनवेची आवश्यकता आहे.सीप्लेन वाहतुकीसंदर्भातील दुसऱ्या देशातील कायदे तपासून भारतातही लवकरच नियम बनवले जातील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. स्पाईस जेट आणि जपानच्या सेटाउची होल्डिंग कंपनीचा हा संयुक्त उपक्रम आहे. पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS