कॅनडात एकीकडे भारत-अमेरिकेसह २० देशांचे प्रतिनिधी कोरियाच्या संकटावर उपाय शोधत असताना, उत्तर कोरिया मात्र शांततेचे सगळे प्रयत्न उधळून लावत आहे. मंगळवारी उत्तर कोरियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टि्वटरवरून केलेल्या टिप्पणीची तुलना 'कुत्र्याच्या भुंकण्याशी' केली. नववर्षाच्या संदेशात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अमेरिकेला इशारा देत म्हटले होते की 'माझ्या टेबलवरच एक 'न्यूक्लिअर बटण' आहे.' या इशाऱ्याचा समाचार घेताना ट्रम्प यांनी म्हटले होते की 'माझ्याकडेही एक न्यूक्लिअर बटण आहे आणि हे त्यांच्या बटणापेक्षा खूप मोठे आणि अधिक शक्तीशाली आहे. विशेष म्हणजे हे कामही करतं.'
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews