ऋषी कपूरने मरण्याअाधी एकदा पाकिस्तान पाहण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. त्यांनी एक ट्विट करत लिहिले आहे की,‘फारुक अब्दुल्ला जी, सलाम ! सर, मी तुमच्या वक्तव्याशी सहमत आहे. जम्मू-काश्मीर आपले आहे, आणि पीओके त्यांचे. आपल्या समस्यांच्या समाधानाची हीच एक पद्धत आहे. मी 65 वर्षांचा आहे आणि मरण्याआधी पाकिस्तान पाहू इच्छित आहे. माझ्या मुलांनी आपली मुळं पाहावीत, अशी माझी इच्छा आहे. या कामाला प्राधान्य द्यावे, जय माता दी!’
खरंतर, ऋषी कपूर यांचे वडिलोपार्जित घर पाकिस्तानच्या पेशावर शहरात अाहे, ते कपूर हवेलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. ते घर पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी 1918 आणि 1922 मध्ये बनवले होते. मात्र कपूर कुटुंब 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर भारतात आले. ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा उल्लेख केला आहे. पण खरी गंमत त्यांनी केलेल्या पुढच्या ट्विट मध्ये त्यांनी मोठ्या विनोद बुद्धीने ते प्रतिउत्तर करत म्हणाले "हळु बोला सर, सनी देओल यांनी ऐकलं तर ते तुमच्याही घरचा पंप उखडून काढतील "
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews