चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली. बॉलिवूड वर्तुळातील अनेकांनी त्यावर मतं मांडली. यावर आता चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘आजकाल महिला भोळेपणाचा आव आणतात. समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे काही महिला पुरुषांचं शोषण करणाऱ्याही असतात,’ असं ते म्हणाले.
इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणावर त्यांना प्रश्न विचारला गेला असता ते म्हणाले की, ‘याप्रकरणी आम्ही काय करू शकतो. एखाद्याचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी दिग्दर्शकांच्या कार्यालयाबाहेर मॉरल पोलिसिंग तर नाही ठेवू शकत ना. महिलांचं शोषण करणारे पुरुष समाजात नसतात असं मी म्हणत नाही आहे. पण, आजकालच्या महिला तितक्या साध्याभोळ्या नसतात, जितकं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही चलाख महिला पुरुषांचंही शोषण करतात.’
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews