पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना लॉटरी लागली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिलाआहे. पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
काँग्रेसला सोडून एनडीए मध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी रविवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. राणेंच्या भेटीनंतर लगेचच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भाजप उमेदवारावर शिक्कामोर्तब झालं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews