२०१३ ची विंबल्डन चॅम्पियन मारियन बार्तोली निवृत्तीनंतर चार वर्षांनी २०१७ मध्ये जेव्हा टेनिस कोर्टवर परतली तेव्हा तिच्या चाहत्यांना एकच धक्का बसला होता. अंगाने सदृढ असलेली बार्तोली अगदी
बारीक झाली होती. फक्त बारीकच नाही तर तिच्या शरीराचा अक्षरश: सांगाडा झाला होता. त्यावेळी आजारपणामुळे बार्तोलीची ही अवस्था झाल्याचे समजले होते, मात्र तिच्या या अवस्थेसाठी आजारपणासोबतच तिचा माजी प्रियकर देखील तितकाच जबाबदार असल्याचे बार्तोलीने आता सांगितले आहे. तिच्या माजी प्रियकराने केलेल्या मानसिक छळामुळे तिची हि अवस्था झाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews