बडोद्याचा अष्टपैलू युसुफ पठाण गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळं या प्रकरणात त्याला पाच महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.युसूफनं टर्ब्युटॅलिन या निषिद्ध द्रव्याचं अजाणतेपणी सेवन केल्याचं आढळून आलं होतं. खोकल्याच्या औषधात टर्ब्युटॅलिनचा वापर करण्यात येतो. या प्रकरणात युसूफवर गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्ट पासून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचं निलंबन येत्या १४ जानेवारी पर्यंत कायम राहिल. दरम्यान,युसूफनं याबाबतची आपली बाजू मांडल्यानंतर बीसीसीआयनं त्याच्यावर केवळ पाच महिन्यांच्या बंदीची कारवाई केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews