‘स्त्री भ्रूण’ हत्येच्या घटनांमुळे काही काळापूर्वी बीड जिल्हा चांगलाच चर्चेत होता. जिल्ह्याची ही बदललेली प्रतिमा सुधारण्यासाठी येथील स्थानिक संघटना प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी याठिकाणी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत जन्म झालेल्या ३०६ मुलींचे १०जाने रोजी एकाच मंडपात बारसे करण्यात आले. स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात हा उपक्रम पार पडला. राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews