कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीशी घडविलेल्या भेटीमागेही पाकिस्तानचा खोटारडेपणा, विश्वासघात, विकृतपणा आणि कुटिल हेतू होता हे आता उघड झाले आहे. भेटीदरम्यान काचेची भिंत उभारून, टेलिफोनच्या माध्यमातून, मराठीऐवजी इंग्रजीतून बोलण्याची सक्ती करून पाकिस्तानने मानवतेच्या भावनेतून भेट घडवत असलेचा जो बुरखा ओढला होता तो गळून पडला आहे. यानिमित्ताने पाकिस्तानचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे संपूर्ण जगाला दिसले असून भारतासह संपूर्ण जगभरातून या छळ-भेटीचा निषेध होत आहे. आता पाकच्या अशा वागणुकीवर या त्याला योग्य ती अद्दल घडविली पाहिजे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews