रस्त्यावरील खड्डयांमुळे घडलेले अनेक किस्से आणि संतापजनक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. यावरून राज्यात विविध ठिकाणी अनेक आंदोलन मोर्चे होतात. आता औरंगाबाद मध्ये याच खड्ड्यांमुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने शहरातील रिक्षा चालकांकडून जास्तीचे भाडे आकारले जात आहे. खड्डे बुजवले तर आम्ही देखील भाडं कमी करू, असं मत रिक्षाचालकांनी व्यक्त केलं.पैठणगेट येथून महानगर पालिकेच्या मुख्य इमारती कडे जायचं म्हटलं तर रिक्षाचालक ४० रूपये भाडे आकारतात. हे अंतर साधारण दीड ते दोन किलोमीटर इतकेच आहे. त्यामुळे नागरिकांकडून या वाढीव भाड्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारदार रिक्षाचालक संघटनांमध्ये पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या रिक्षा युनियनचाही समावेश आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews