चालू घडामोडी असतील किंवा एखाद्या विषयावरील मत असेल, बिग बी ट्विटवर सातत्याने व्यक्त होत असतात. मात्र, मंगळवारी त्यांनी केलेल्या एका ट्विटने नेटकऱ्यांनाही बुचकळ्यात पाडले. त्या ट्विटमधून बिग बींना नेमके काय म्हणायचे आहे, याचा शोध लावत अनेकांनीच मजेशीर रिप्लायसुद्धा दिले आहेत.
अमिताभ यांनी ट्विटरवर फक्त ‘छान’ (Nice) असा शब्द पोस्ट केला. आता हे त्यांनी कोणाला म्हटले, कशासाठी म्हटले हे,असे एक ना हजार प्रश्न त्यांच्या फॉलोअर्समध्ये उपस्थित झाले. काहींनी त्यांना कारणही विचारले.आता त्या ट्विटचा नेमका काय अर्थ होता, हे बिग बी स्वत:च सांगू शकतील.विशेष म्हणजे कोणताही संदर्भ न लागणाऱ्या या बिग बींच्या ट्विटला भरभरून लाईक्सही मिळाले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews