मुंबई महापालिकेत २००९ नंतर सर्वात मोठय़ा मेगा भरतीला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण 1388 जागा भरल्या जाणार आहेत. राज्यसरकार आणि टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाइन लिमिटेड कंपनीतर्फे या भरतीचे नियोजन होणार आहे.जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण, कामगार, कक्षपरीचर, हमाल, आया, स्मशान कामगार अशा चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण 1388 जागा या भरतीत भरण्यात येणार आहे.शेवटची तारीख 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आणि तिस-या आठवडय़ात ऑनलाईन परीक्षाही घेण्यात येणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews