कॉंग्रेस गुजरात निवडणूकीत भाजपला हरविण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तांची मदत घेत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून शत्रुघ्न सिन्हानी मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. आदरणीय सर, तुम्ही निवडणूका जिंकण्यासाठी तुमच्या विरोधकांवर असे असमर्थनीय व अविश्वसनीय आरोप कसे करु शकता? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचे पाकिस्तानी उच्चायुक्तां सोबत, अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा आरोप करणे हे भयंकर आहे. असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे. या एका ट्विटवर सिन्हा थांबले नाही तर त्यांनी आणखी एक ट्विट करत पंतप्रधानांवर निशाणा साधला.सर, प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देण्यापेक्षा योग्य मार्गाने निवडणूक लढा. आपण जनतेला विकास मॉडेलच्या नावाखाली शहरी विकास, रोजगार, चांगल्या वैद्यकीय सोयी यांची जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करा. सांप्रदायिक वाद निर्माण करून देशाचे वातावरण खराब करण्यापेक्षा चांगले व सशक्त राजकारण करा. जय हिंद!’
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews