दुबईतील बुर्ज खलीफा या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारती म्हणून ओळख आहे. गगनचुंबी अमारती उभारण्याची चढाओढ वाढतच आहे. आता न्यूयॉर्कच्या ओइयो स्टुडिओ या कंपनीने उलटय़ा ‘यू’ आकारची इमारती उभारण्याची तयारी सुरू केली असून, ही इमारत जगात सर्वात उंच असेल, असा या कपंनीच दावा आहे.
या इमारतीची उंची चार हजार फूटांहून अधिक राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या इमारतीचे नाव ‘द बिग बेंड’असेल. सेंट्रल पार्कच्या जवळ ‘बिलिनेयर रो’येथे ती उभी राहणार असून, शहरातील अनेक शाही इमारती याच ठिकाणी आहेत. वन 57 टॉवर (शहरातील आठवी सर्वात उंच इमारत) आणि लवकरच तयार होणार आहे.बिल्डिंग 111 वेस्ट या इमारतींच्या मध्ये ही इमारत असेल. काचेच्या या इमारतीतील लिफ्टचे काम सर्वात आव्हानात्मक असेल. कारण ही लिफ्ट ‘यू’ आकारात चालणार आहे. तयार झाल्यास ही इमारत बुर्ज खलिफा, न्यूर्यार्कच्या वन वर्ल्ड ट्रेड सेंटरसह जगातील इतर सर्व उंच इमारतींच्या दुप्पट असेल.