गर्लफ्रेण्ड ला प्रपोज करण्यासाठी त्याने खरेदी केले 25 आयफोन | China Latest News | IPhone News

Lokmat 2021-09-13

Views 1

गर्लफ्रेण्डला प्रपोज करण्यासाठी बॉयफ्रेण्ड काय शक्कल लढवेल सांगता येत नाही. तिचे हृदय जिंकण्यासाठी प्रसंगी तो कितीही पैसे खर्च करु शकतो. अशीच एक घटना नुकतीच घडली. चीनमधील एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेण्डला पटविण्यासाठी तब्बल 25 आयफोन खरेदी केले. विशेष म्हणजे या आयफोनचा त्याने हार्टशेप तयार करत त्यात फुलांचे आच्छादन करत या अवलियाने तिला प्रपोज केले.चिन मिंग हा व्यवसायाने गेम डिझायर आहे त्याने आपल्या गर्लफ्रेण्डला प्रपोज करण्यासाठी 25 ‘आयफोन एक्स’ खरेदी केले. दोघेही टेक्नोसेव्ही असल्याने चिन मिंगने प्रपोज करण्यासाठी ही हटके पद्धत वापरली. दोघांनाही मोबाईल गेम खेळायला फार आवडतात. आता आपल्या गर्लफ्रेण्डला जो 25 आयफोन खरेदी करून देऊ शकतो तो तिला खूश ठेवण्यासाठी प्रसंगी काहीही करु शकतो. इतके सगळे केल्यावर त्याच्या प्रेयसीने त्याला काय उत्तर दिले याबाबतही उत्सुकता आहेच. तर प्रियकराने इतक्या हटके पद्धतीने आणि इतके पैसे खर्च करत प्रपोज केल्यावर साहजिकच ही प्रेयसीही त्याच्यावर भाळली आणि तिने लगेचच होकार दिला.सोशल मीडियावर या कपलचा फोटो भलताच व्हायरल होत असून त्याला अनेकांनी लाईक केले आहे. आम्हालाही असाच प्रियकर मिळायला हवा अशा प्रतिक्रियाही तरुणींनी व्यक्त केल्यात. चिन याची गर्लफ्रेंड 25 वर्षांची असल्याने त्याने 25 फोन खरेदी केले आहेत. आता या 25 फोनचं ते काय करणार असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर चिन आपल्याला प्रेमाच्या प्रवासात आपल्याला मदत करणाऱ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हे फोन भेट म्हणून देणार असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे गर्लफ्रेण्डला मनवताना या पठ्ठ्याने आपल्या मित्रपरिवारालाही खूश केले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS