संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागणी केली होती कि “ जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात” . परंतु दैव कोणाची काय परीक्षा घेईल ते सांगता येत नाही. आपले स्वतःचे एक घर असावे, छोटे असले तरी चालेल पण ऊन-वारा- पावसापासून संरक्षण करणाऱ्या चार भिंती आणि डोक्यावर हक्काचे छत. हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आणि ते साकार करण्यासाठी जो-तो धावत असतो. धडपडत असतो. ओडीशातल्या छोटाश्या गावात राहणारा छोटू रौशियाही त्यापैकीच एक. पण सरकार दरबारी अनेक खेटे घालून, अधिकाऱ्यांच्या मिन्नतवारी करूनही त्याला पंतप्रधान आवास योजनेतून घर काही मिळाले नाही. शेवटी, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मिळालेल्या शौचालयात पथारी टाकण्याची वेळ त्याच्यावर आली. १९५५ मध्ये रावूरकेला स्टील प्रकल्पाच्या उभारणी वेळी हे कुटुंब विस्थापित झाले. त्याची दयनीय अवस्था पाहून सरपंचांनी शौचालय बांधून देण्याची शिफारस केली. आणि हा हे शौचालयचं त्याचे घर झाले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews