पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 व्या आशियाई परिषदेसाठी फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये आहेत. यावेळी मोदींनी तिथल्या 9 वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी खास वेळ काढला. कार्लो माईगेल असं त्याचं नाव असून, तो फिलिपीन्सच्या बुलाकन प्रांतात राहतो . ‘जयपूर फूट’ लावलेल्या हजारो मुलांपैकी तो एक आहे, याच प्रोस्थेटिक पायामुळे कार्लो चालू शकतो.मोदींच्या भेटीदरम्यान ‘जयपूर फूट’मुळं आपलं वावरणं खूप सोपं झाल्याचं त्यानं मोठ्या आनंदानं सांगितलं. मनीलातील ‘महावीर फिलिपीन्स फाऊंडेशन’मध्ये त्याची मोदींशी भेट झाली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews