मुंबई - काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने 500, 1000 रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी गुरुवारी दिसून येत होती. मुंबईसह राज्यातील काही शहरात बँक आणि पोस्ट ऑफिसच्या बाहेर नागरिकांनी रांगाच रांगा लावल्या होत्या.