नववर्षात साई दर्शनासाठी भाविकांची शिर्डीत अलोट गर्दी आहे. सशुल्क दर्शनपास घेण्यासाठी भाविकांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. नव वर्षात साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. अनेकांनी साईंचे मुखदर्शन तसेच कळसाचे दर्शन घेत समाधान व्यक्त केलं. भाविकांच्या गर्दीने रस्ते, बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.