Bomb Blasts At Kabul Airport : काबूल विमानतळावर आत्मघाती स्फोट, 80 जणांचा मृत्यू
Afghanistan : अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती स्फोटात 80 जण ठार तर 200हून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये 12 अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. देशाबाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळ आणि परिसरात तीन स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. दरम्यान आत्मघातकी साखळी स्फोटांची जबाबदारी 'ISIS' या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. अमेरिकेसह जगभरातील विविध देशांनी या हल्ल्याचा निषेध केला. काबूल विमानतळावर हल्ला होऊ शकतो असा अलर्ट यापूर्वीच अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिला होता.
#BombBlast #Kabul #kabulairport #ISIS #Afghanistan