राज्य सरकारच्या चुकीमुळे १५ लाख लोक धान्यापासून वंचित : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : राज्य सरकारने नागपूर शहर व जिल्ह्यातील ४ लाख शिधापत्रिका एनपीएचमध्ये टाकल्या. परिणामी या ४ लाख शिधापत्रिकेवर अवलंबून असलेल्या १५ लाख लोकांना धान्य मिळत नाहीये. हा सर्व कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारच्या म्हणण्यावर केलेला आहे. त्यामुळे लाखो लोक आज अन्नापासून वंचित राहत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.
#chandrashekharbawankule #nagpur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics