सरकारने पुन्हा एकदा राज्यातल्या कृषी पंपधारकांना, शेतकऱ्यांना आणि घरगुती, आर्थिक दुर्बल, मध्यवर्गीय लोकांना फसवले आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच वीज बिलाच्या संबंधाने राजकारण सुरू आहे. पहिले सांगितलं की, १०० युनिट माफ करू, मग सांगितलं की कोवीडच्या काळातील चार महिन्यांचं बिल माफ करू, तर कधी हे सांगतात की ३३ टक्के बिल माफ करू. सरकार या मुद्यावर केवळ नौटंकी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics