महाविकास आघाडी सरकार जनतेच्या जीवाशी खेळ करत आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना राज्यात #redmesivir व कोविड आजारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या औषधांचा काळा बाजार सुरू आहे. राज्यातील कोविड रुग्णांना दवाखान्यांमध्ये बेड मिळत नाहीये, रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर मिळत नाहीये, रुग्णांची सरसकट लूटमार सुरू असताना या सर्व विषयावर दुर्लक्ष करून फक्त करण्यासाठी आम्हाला लसींचा पुरवठा कमी होत असल्याबाबत आदळआपट केली जात आहे.
स्वतः ची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्र सरकारच्या नावाने हा शिमगा सुरू असून महाविकास आघाडी सरकारचे धोरण जनतेच्या जीवाशी खेळण्याचे आहे.
- माधव भांडारी
प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र
#sarkarnama #politics #bjp #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics