रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणून देणाऱ्यास १२ लाखाची गाडी आणि दहा लाख रोख देऊ असं खळबळजनक वक्तव्य यवतमाळमध्ये एका सेना नेत्याने केले आहे . संतोष ढवळे असं या सेना नेत्याचे नाव असून यवतमाळ विधानसभा संपर्क या पदावर कार्यरत आहे .
आज यवतमाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच शेतकरी आंदोलनाबाबत एक धक्कादायक विधान केले होते या बाबींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले ,या आंदोलना दरम्यान संतोष ढवळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याबद्दल असं खळबळजनक वक्तव्य केले आहे . या विधानाचे समोर भाजपा कडून आणखीन काय प्रतिसाद उमटतात हे बघणं औत्सुक्याचे ठरेल .