दानवेंची जीभ कापणाऱ्यास १२ लाखांची गाडी, दहा लाख रोख | Yavatmal | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 647

यवतमाळ : रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणून देणाऱ्यास १२ लाखांची गाडी आणि दहा लाख रोख देऊ असे खळबळजनक वक्तव्य यवतमाळमध्ये एका सेना नेत्याने केले आहे. संतोष ढवळे अस या सेना नेत्याचे नाव आहे. ते यवतमाळ विधानसभा संपर्क या पदावर कार्यरत आहे. आज यवतमाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच शेतकरी आंदोलनाबाबत एक धक्कादायक विधान केले होते. या बाबींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले. आंदोलना दरम्यान संतोष ढवळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. या विधानाचे समोर भाजपकडून आणखी काय प्रतिसाद उमटतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. (व्हिडिओ - प्रसाद नायगावकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS