#EknathShinde #CmUddhavThackeray #SumantRuikar #MaharashtraTimes
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी तिरुपतीला जाताना शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला शिवसेनेकडून मदतीचा हात मिळाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर यांचं संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी घेतली असून प्राथमिक स्वरूपात त्यांना पाच लाख रुपयांची रोख मदत केली गेलीय. शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे रुईकर यांच्या कुटुंबाशी संवाद साधत त्यांना आधार दिलाय. लवकरच घर देखील बांधून देण्यात येईल असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे