परभणी : बोगस सोयाबीन शेतकऱ्यांच्या माथी मारून प्रचंड माया जमविल्यानंतर आता वितरकांनी कारवाई होऊ नये, म्हणून बंदचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाने कारवाईच्या नावाखाली वेळकाढूपणा केला आहे. त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वितरकांवर कारवाईची मागणी केली आहे. बोगस बियाणे विकणाऱ्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे वंचितचे राज्य समन्वयक डॉक्टर धर्मराज चव्हाण यांनी सांगितले.
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #Department of Agriculture