राजुरा (जि. चंद्रपूर) : निवडणूक म्हणजे आर्थिक घोडेबाजार. मग ती लोकसभेची असो की, ग्रामपंचायतीची. निवडणूक मतदारांना आपल्याबाजूने मतदान करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब होत असतो, नको ते स्थरावर जात असतात मात्र राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकीक असलेल्या चुनाळा ग्रामपंचायत येथील आज (दि. १२) झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत तेरा सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांपैकी सात महिलांनी हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे पॅटर्न राबवित चुनाळा येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच व समाजसेवक बाळनाथ वडस्कर ऊर्फ "बाळूभाऊ" यांच्यावर विश्वास ठेवत सरपंच पदाकरिता एकही आवेदनपत्र न भरल्याने व उपसरपंच पदासाठी एकमेव बाळनाथ वडस्कर यांचीच बिनविरोध निवड झाली. हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांचे धर्तीवर बाळनाथ वडस्कर यांच्याकडे गावाचा कारभार दिला आहे. गावाच्या विकासासाठी महिलांनी खुर्चीचा लोभ सोडला आणि सर्वांच्या मदतीला धावून येणारा बाळूभाऊ च्या हाती अखेर गावच्या कारभाराची सूत्रे दिली. सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या राजकीय वातावरणात चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळा ग्रामपंचायतीने वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.
(व्हिडिओ : श्रीकृष्ण गोरे /आनंद चलाख)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.