चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील निजामकालीन प्राचीन मालगुजारी तलाव जलीय वनस्पतीच्या विळख्यात सापडला आहे . यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झालेले आहे. मागील आठ वर्षापासून या तलावाच्या सौंदर्य करण्यासाठी मोठा प्रकल्प नगरपरिषदेने हाती घेतलेला आहे. राज्य सरोवर संवर्धन प्रकल्प अंतर्गत तलावाचे सौंदर्यीकरण सुरू आहे. मात्र इकॉर्निया जलीय वनस्पतीने तलावाचे सौंदर्य नष्ट केले आहे. तलावाच्या सौंदर्यीकरण यासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी स्वच्छता मोहिम हाती घेतलेली आहे. मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी सोसायटी व नगर परिषद च्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक तलावाचे सौंदर्य जपण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे.
व्हिडिओ ...आनंद चलाख/ श्रीकृष्ण गोरे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.