गॅस कटरनं फोडली दुकानं अन् चोरट्यांनी आईस्क्रीमवरही मारला ताव
बारामती, ता. 27- शहरातील शिवाजी चौकातील वर्दळीच्या ठिकाणची पाच दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरने फोडत रोकड चोरुन नेली. या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात चोरीचा हा प्रकार कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुख शांती अपार्टमेंटमधील ही पाच दुकाने आहेत. कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर अशी पाच दुकाने गॅस कटर व मोठ्या कात्रीने उघडून त्यातील रक्कम लंपास केली गेली. रात्रीची आणि दिवसाची गस्त सुरु असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून भर चौकातील दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिल्याची बारामतीत चर्चा आहे. एकीकडे पोलिसांची सावकारांसह इतर बाबींवर मोहिम सुरु असताना दुसरीकडे नियमित होणा-या चो-यांच्या घटनांनी बारामतीकरांची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे.
ही दुकाने फोडल्यानंतर एका आईसक्रीम पार्लरमध्ये असलेल्या आईसक्रीमवर चोरट्यानी निवांत तावही मारला. चोरट्यांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याचेच हे निदर्शक असल्याची आज शहरात चर्चा होती.
मिलिंद संगई, बारामती...
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.