#आज_भारत_बंद_है :माकपच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार ःअनेक कार्यकर्ते जखमी | Solapur |Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 3.9K

सोलापूर ः नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आज दुपारी 12 वाजता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयातून माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघाला. हा मोर्चा पद्मशाली चौक, जोडबसवण्णा चौक, साखर पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता, पण अचानक मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला. मोर्चा शांती चौक पाण्याच्या टाकीकडे वळाला. तेव्हा मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोर्चा आपण काढणार आहोत अशी भूमिका घेत आडम मास्तरांनी मोर्चा काढला.
मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही. तेव्हा तेथे मोर्चेकऱ्यांशी पोलिसाचा वाद झाला. पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या समोरील चौकात आंदोलकर्त्यांनी ठिय्या मांडला. हे पाहून पोलिस अधिकच संतापले. पोलिसांनी एकेका कार्यकर्त्याला ताब्यात घ्यायला सुरवात केली. कार्यकर्त्यांची पोलिसांनी अक्षरशः उचलबांगडी करून त्यांना पोलिस व्हॅनमध्ये कोंबले. महिला कार्यकर्त्यांबरोबरही पोलिसांनी धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे कार्यकर्ते संतापले असून माजी आमदार नारसय्या आडम यांनी आपण राज्यपाल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. या वेळी युसूफ मेजर, विजय हरसुरे, अनिल वासम, बाळकृष्ण मल्ल्याळ, दाऊद शेख, शाम आडम, बिलाल तहसीलदार आदींना जबरदस्त मारहाण झाली आणि अटक करण्यात आली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS