चांदोरीकर जोपासत आहे अनेक वर्षांची काकड आरतीची परंपरा |Nashik|Sakal|Sakal Media Group|

Sakal 2021-04-28

Views 226

आजच्या वैज्ञानिक युगातही धार्मिक परंपरेचे महत्व टिकून आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील काकडा आरतीची परंपरा निरंतर सुरू आहे. यावर्षी चांदोरी दुर्गादेवी मंदिरामध्ये मध्ये कोजागिरी पौर्णिमेला काकडा आरतीला प्रारंभ झाला असून पणती पौर्णिमेला समाप्ती होणार आहे. टाळ मृदंग, तानपुरा, घंटानांदाच्या स्वरांनी चांदोरी गावातील नागरिकांची पहाटारंभ उल्हासित वातावरणात होत आहे. पहाटे पाच वाजता दुर्गादेवी मंदिरात सर्वजण एकत्र येतात. त्यानंतर घंटानांद करुन काकडे पेटवून धार्मिक गीतांची सुरुवात होते. ‘जय जय राम कृष्ण हरी...’ या भजनाने भक्तिमय वातावरणा सुरुवात केली जाते. पहाटे उठू मोठ्या भक्तीभावाने हरिनामाचा गरज केला जात असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण दिसू लागले आहेत. अनेक नागरिक अभंगाचा ध्वनी कानी पडू लागल्याने समाधान व्यक्त करत आहे

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS