खडकवासला, ता.१८ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, सार्वजनिक व गर्दीची ठिकाणं जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशांनी बंद झाली. जिल्ह्यातील लोणावळा, भुशी डॅम यांसारखे अनेक पर्यटन स्थळ सुरू झाली. त्यानंतर गड- किल्ले ट्रेकर्ससाठी सुरू झाले. परंतु शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ला व खडकवासला चौपाटी अद्याप सुरू झालेली नाहीत.
गड सुरू करण्याची शिवसेनेची मागणी
मागील कित्येक वर्षांपासुन येथील स्थानिक लोकांचा सिंहगडाचे पर्यटनावरच उदरनिर्वाह चालतो. आता तरी सिंहगड पर्यटकांसाठी खुला करा. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
घाट रस्त्यालगत संरक्षक जाळी बसविण्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील आठवड्यात सुरु केले आहे. यासाठी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर पुढील तीन आठवडे घाट रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून ठेकेदारांकडून देखील जाणीवपूर्वक नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच काम सुरू करत असल्याचा अनुभव आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोकांची गैरसोय होते. असा ही आरोप कोंडे यांनी केला आहे.
व्हिडीओ आणि बातमी - राजेंद्रकृष्ण कापसे
#SinhgadFort #Tourism #KhadakwaslaDam #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.